लातूर -विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर तासंतास वर्गात बसायची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. परीक्षेचा वेळ सुरू झाल्यानंतरही प्रश्नपत्रिका बराच वेळ वर्गात न आल्याने, परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. प्रश्नपत्रिकेला विलंब झाल्याने परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला होता.
परीक्षा की सत्वपरीक्षा? स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका
विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर तासनतास वर्गात बसायची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत एम. ए. आणि एम. कॉमच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षा सुरू आहेत. मात्र प्रश्नपत्रिका वेळेत न मिळाल्यानं विद्यार्थ्यांवर तब्बल चार तास परीक्षा केंद्रात बसण्याची वेळ आली.
परीक्षार्थी विद्यार्थी
सध्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत एम. ए. आणि एम. कॉमच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षा सुरू आहेत. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी उदगीरमधील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी हजर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सर्व काळजी घेऊन परीक्षा केंद्रावर आले होते. परीक्षा सकाळी 11 ला सुरू होणार होती, मात्र दुपारचे 3 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकाच न आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी विलंब झाला.