लातूर - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असला तरी दुचाकीधारक आणि चार चाकी वाहने रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करण्याची नामुष्की ओढवली होती. तर बसेस बंद असल्याने थेट पुण्याहून दुचाकीवरून गाव जवळ केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
कोरोना अपडेट : संचारबंदीतही लातुरात दुचाकींची वर्दळ; ग्रामीण भागात शुकशुकाट
परजिल्ह्यातील वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे पाहावयास मिळत आहे. दुचाकी वाहनावरून तरुणांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळेच शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई याठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. सध्या बसेस बंद असल्याने पुण्याहून येणाऱ्यांची संख्या मंदावली आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, 32 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. असे असताना जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच परजिल्ह्यातील वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे पहावयास मिळत आहे. दुचाकी वाहनावरून तरुणांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळेच शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई याठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. सध्या बसेस बंद असल्याने पुण्याहून येणाऱ्यांची संख्या मंदावली आहे. मात्र, दुचाकीवरून गाव जवळ केले जात आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांनी गाव न सोडण्याचा निर्धार केला आहे. शिवाय शहरातून येणाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आवाहन दवंडी देऊन केले जात आहे.
हेही वाचा -#Corona : राज्यात कोरोनाचा तिसरा बळी, 64 वर्षीय वृद्धाचा मुंबईत मृत्यू