लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागात वाढत असला तरी याबाबतची जनजागृती आता गावपातळीवरही केली जात आहे. गावात दवंडी देऊन माहिती देणे ही जुनी गोष्ट आहे. पण आता याच दवंडीच्या पद्धतीचा अवलंब कोरोना बद्दलच्या जनजागृती केला जात आहे. दवंडी देणारा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोरोनाबद्दल अशी ही जनजागृती, जुनी परंपरा- नव्याने समोर..!
कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी दवंडीचा उपयोग ग्रामिण भागात केला जात आहे. लातूर तालुक्यातील गावातला असाच काहीसा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे...
कोरोना व्हायरसचे रुग्ण हे पुणे- मुंबई या शहरांमध्ये अधिकचे आहेत. या शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेल्या नागरिकांनी आपल्या गावचा मार्ग धरला आहे. त्यामुळे परातणाऱ्यांची संख्या वाढली असून लातुरात दाखल होणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांनी सूचित करावे की, गावाकडे येण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातच प्राथमिक तपासणी करावी. त्यामुळे संभाव्य धोका टाळता येणार आहे. पूर्वी रेशन दुकानाला आलेला माल सांगण्यासाठी किंवा ग्रामसभेची माहिती देण्यासाठी अशा प्रकारे दवंडी दिली जात होती. आता बऱ्याच अवधीनंतर अशा प्रकारे दवंडी देण्याची वेळ कोरोना व्हायरस मुळे आली आहे. लातूर तालुक्यातील गावातला असाच काहीसा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे...
TAGGED:
Mh_latur_news01