महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन : 'या' गावात रामनवमीचा सप्ताह झाला अनोख्या पद्धतीने साजरा - lockdown

चौकाचौकात रावण, कुंभकर्ण यांसारखे कोरोना राक्षस बसलेले आहेत. या रामनवमीला त्यांचे दहन आपल्याला करायचे आहे. यासाठी सर्वांनी घरातच बसा. प्रवचनकारांनी मंदिरातील लॉऊडस्पीकरवर गावकऱ्यांना किर्तनातून दिला संदेश.

latur Ambulaga Budruk Village
लातूर अंबुलगा गाव

By

Published : Apr 3, 2020, 10:12 AM IST

लातूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि उत्सव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी गावोगावी होणारा रामजन्मोत्सव देखील मर्यादित स्वरुपात उरकण्यात आला आहे. मात्र, लातूरातील अंबुलगा गावाने अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा केला. या गावात रामनवमीचा सप्ताह असतो. यावर्षी या सप्ताहात प्रवचनकारांनी मंदिरातील लॉऊडस्पीकरवरच गावकऱ्यांना किर्तनातून संदेश दिला आहे.

लातूरातील आंबुलगा गावात रामनवमीचा सप्ताह अनोख्या पद्धतीने साजरा...

हेही वाचा...धार्मिक स्थळे बंदीचे आदेश असताना भाविक जमलेच कसे?

संपूर्ण अंबुलगा (बु.) गावात लॉकडाऊनचे पालन होत आहे. या गावात चौकाचौकात लाऊडस्पीकर बसवण्यात आले आहेत. या लाऊडस्पीकरवरून लोकांना घरात राहण्याबाबत आवाहन केले जात आहे. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत गावात मागील पंचवीस वर्षांपासून सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी होत असते. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन काही पथ्ये सध्या पाळली जात आहेत.

या वर्षीच्या सप्ताहात गावातील मारूती मंदिरात प्रवचनकार एकटेच आहेत आणि ते लाऊडस्पीकरवरून प्रवचन देत जनजागृती करत आहेत. चौकाचौकात रावण, कुंभकर्ण यांसारखे कोरोना राक्षस बसलेले आहेत. या रामनवमीला त्यांचे दहन आपल्याला करायचे आहे. यासाठी सर्वांनी घरातच बसा. असा संदेश प्रवचनकार मंदिरातील लॉऊडस्पीकरवरून गावकऱ्यांना देत आहेत. जर प्रत्येक मंदिरातून असाच प्रकारे प्रबोधन सुरू झाले, तर खऱ्या अर्थाने भागवत धर्म आणि संतांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहचली असे समजावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details