लातूर- कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले घश्याचे स्त्राव (स्वॅब) घेवून त्यासंबंधीचे अहवाल लातूरमध्येच मिळणार आहेत. ही कोरोनाची चाचणी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे.
लातूर शहर व जिल्ह्यातील रुग्णांच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅब हे पुणे येथील प्रयोशाळेत दिले जात होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अहवाल मिळण्यास विलंब लागत होता. त्यांनतर काही दिवसांमध्ये हेच नमुने सोलापूरला पाठविण्याची सोय झाली होती. मात्र, सोलापूरसह उस्मानाबाद, लातूर येथील सर्व नमुने एकाच ठिकाणी असल्याने एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने घेतलेल्याच ठिकाणी अहवाल मिळण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना तपासणीचे अहवाल हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा-कोरोनाची टेस्ट, उपचार मोफत; रुग्णांनी स्वतःहून समोर येण्यासाठी निर्णय