महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची धास्ती: महाराष्ट्रात 'इथे' मिळतीये कपभर चहाच्या दरात कोंबडी... - लातूर कोरोना बातमी

चीनमध्ये सुरू झालेला कोरोना व्हायरस आता सबंध जगभर पसरत आहे. मात्र, भारतात त्या विषाणूचे रुग्ण आढळून येताच सर्वाधिक परिणाम हा चिकन विक्रीवर झाला आहे. जिल्ह्यात दिवसाकाठी 30 ते 35 टन चिकनची विक्री व्हायची. मात्र, घट होऊन 80 टक्के मागणी घटली आहे.

corona-effect-on-chicken-market-in-latur
corona-effect-on-chicken-market-in-latur

By

Published : Mar 9, 2020, 4:48 PM IST

Updated : Mar 9, 2020, 5:00 PM IST

लातूर - चीनसह संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. नागरिकांध्ये भितीचे वातवरण परसले आहे. भारतात देखील कोरोनाचे 40 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये या विषाणूची चांगलीच दहशत पसरली आहे. त्यातच चिकनमुळे कोरोना होतो, अशा आशयाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अफवेचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. चिकनमुळे कोरोना होतो या भितीने ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवली अन् चिकनच्या दराने आपटी खाल्ली.

महाराष्ट्रात 'इथे' मिळतीये कपभर चहाच्या दरात कोंबडी...

सध्या लातुरात चहा पेक्षा चिकन स्वस्त मिळत आहे. 70 रुपये किलोची कोंबडी आता 7 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मर हवालदिल झाले असून त्यांनी आता चिकनचे उत्पादन घेणेच बंद केले आहे.

हेही वाचा-मनसेचा आज वर्धापन दिन, शॅडो कॅबिनेटची होणार घोषणा

चीनमध्ये सुरू झालेला कोरोना व्हायरस आता सबंध जगभर पसरत आहे. मात्र, भारतात त्या विषाणूचे रुग्ण आढळून येताच सर्वाधिक परिणाम हा चिकन विक्रीवर झाला आहे. जिल्ह्यात दिवसाकाठी 30 ते 35 टन चिकनची विक्री व्हायची. मात्र, घट होऊन 80 टक्के मागणी घटली आहे. तर 7 रुपये किलोने कोंबड्यांची विक्री करण्याची तयारी फार्मरने दाखवली असतानाही व्यापारी खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. चिकनमुळे कोरोना व्हायरस होतो ही अफवा आता गावपातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे तयार झालेल्या कोंबड्या विकाव्या तरी कशा? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, चिकनचा आणि कोरोना विषाणूचा काडीमात्र सबंध नसल्याचे पटवून देण्यासाठी 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. सरकारकडूनही जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, त्याचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही. अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. मात्र, पोल्ट्री फार्मर अडचणीत सापडला असून भविष्यात काय होणार या विवंचनेत आहे. त्यामुळे सरकारने झालेले नुकसान लक्षात घेता अनुदान स्वरुपाने मदत करण्याची मागणी आता उत्पादक करीत आहेत.

Last Updated : Mar 9, 2020, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details