लातूर- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत शहरासह ग्रामीण भागातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, शासकीय यंत्रणेवर ताण वाढत असतानाच या यंत्रणेत काम करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, गांधी पोलीस ठाण्यातील 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
लातुरातील शासकीय यंत्रणेत कोरोनाचा शिरकाव, पोलीस अधिकाऱ्यासह मनपा कर्मचाऱ्याला लागण - लातूर पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
शासकीय यंत्रणेवर ताण वाढत असतानाच या यंत्रणेत काम करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, गांधी पोलीस ठाण्यातील 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दुसरीकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लॅब टेक्निशियन कर्मचाऱ्याचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
लातुरातील शासकीय यंत्रणेत कोरोनाचा शिरकाव
दुसरीकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लॅब टेक्निशियन कर्मचाऱ्याचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनावरील ताण अधिक वाढणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 220 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 68 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.