महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; लातुरात सर्वपक्षीय नेते एकत्र

कृषी विधेयक कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. गुरुवारी ठिकठिकाणी कृषी समन्वयक समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. लातूर येथे पार पडलेल्या आंदोलनात काँग्रेसने या निदर्शनास पाठींबा दिला आहे. तर मोदी सरकार जाचक अटी शेतकऱ्यावर लादत असून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

protest
शेतकऱ्यांशेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबाच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

By

Published : Dec 3, 2020, 4:57 PM IST

लातूर - कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लातूर येथील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेसच्यावातीनेही पाठिंबा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

उद्योगपती यांच्यासाठी हे कायदे -

केवळ बहुमताच्या बळावर अन्यायकारक कृषी धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे. हे धोरण शेतकऱ्यांसाठी हानिकारक असून उद्योगपती यांच्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत याला विरोध होत आहे. असे असतानाही केंद्र सरकार यावर कोणताही तोडगा काढत नाही. एकीकडे देश कोरोनासारख्या समस्येला सामोरे जात असताना सरकारने हा कृषी विषयक कायदा आमलात आणला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा दर ठरविणे हे पूर्णपणे उद्योजकांच्या हाती राहणार आहे. या कायद्याला विरोध करीत लाखो शेतकरी हे दिल्लीत पोहचले आहेत. असे असताना केवळ बैठका पार पडत असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरी नीराशाच आहे. प्रत्यक्ष शेतकरी हे दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी होत नसले तरी या आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी आज देशभर निदर्शने करण्यात आली. लातूर येथील गांधी चौक येथे या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तर दुसरीकडे काँग्रेस भवन येथून काँग्रेसचे पदाधिकारी हे आंदोलनात सहभागी झाले. मोदी सरकार शेतकऱ्यांचे हिताचे नाही तर उद्योगपती यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा घणाघात यावेळी करण्यात आला.

शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

येथील गांधी चौकात निदर्शने करून शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. एवढेच नाही तर सरकारच्या भूमिकेचा विरोध करीत शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. त्यामुळे गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा -'पॉप्युलर फ्रंट'च्या कार्यलयावर ईडीचा छापा; महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात

हेही वाचा -धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरीश पटेल विजयी

ABOUT THE AUTHOR

...view details