लातूर - दुष्काळी परिस्थितीमध्येही उपाययोजनांकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. याचा निषेध म्हणून आज जिल्ह्यातील (२७ मे) शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात निलंगा येथील उपविभागीय कार्यालयावर रूमणे मोर्चा काढला. निलंगा हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघ आहे.
संभाजी पाटील-निलंगेकरांच्या मतदारसंघात काँग्रेसचा 'रूमणे मोर्चा' - gardien minstery
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी, तसेच शेती पंपाचे वीजबिल माफ करावे. नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे. वंचित शेतकऱ्यांना धान्य मोफत द्यावे, जी गावे पीकविम्यापासून वंचित आहेत त्यांना त्वरित पीकविमा द्यावा, वीजपुरवठा सुरळीत करावा
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरीपासाठी खाते आणि बी-बियाणे मोफत द्यावे, मजुरांच्या हाताला मनरेगातून कामे द्यावीत किंवा जॉबकार्ड धारकास रोजगार भत्ता द्यावा, तत्काळ चारा छावण्या चालू कराव्यात किंवा दावणीवर चारा द्यावा. प्रत्येक गावात मागणीप्रमाणे तत्काळ टँकर व अधिग्रहण चालू करावे, अशा मागण्या यावेळी शेतकरी आंदोलकांनी केल्या.
या बरोबरच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी, तसेच शेती पंपाचे वीजबिल माफ करावे. नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे. वंचित शेतकऱ्यांना धान्य मोफत द्यावे, जी गावे पीकविम्यापासून वंचित आहेत त्यांना त्वरित पीकविमा द्यावा, वीजपुरवठा सुरळीत करावा यासह अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी निलंगा, देवणी, शिरूळानंतपाळ या तिन्ही तालुक्याचे शेतकरी व कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.