महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

....तर महाशिवआघाडीच्या सत्तेत काँग्रेसला मिळणार नवसंजीवनी - धीरज देशमुख

भाजपला आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादीला पुन्हा पक्ष मजबुतीसाठी ही सुवर्ण संधी राहणार आहे. मात्र, ही सर्व गणिते महाशिवआघाडीची सत्ता स्थापन झाल्यावरच शक्य आहेत हे तेवढेच खरे....

....तर महाशिवघाडीच्या सत्तेत काँग्रेसला मिळणार नवसंजीवनी

By

Published : Nov 16, 2019, 9:38 AM IST

लातूर - राज्यात महाशिवआघाडीची सत्ता स्थापन झाल्यास या आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेला जिल्ह्यात फारसे महत्व राहणार नाही. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळणार हे नक्की. सध्या महाशिवघाडी सत्तेची समीकरणे जुळवू लागली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या पदरी काय पडणार याची चर्चा आता जोरात होऊ लागली आहे. जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच नगण्य आहे. यातच लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे महाशिवआघाडी सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली तरी याचा अधिकतर फायदा हा काँग्रेसलाच होणार आहे.

....तर महाशिवआघाडीच्या सत्तेत काँग्रेसला मिळणार नवसंजीवनी
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2014 च्या निवडणुकानंतर या पक्षाचे महत्व कमी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था पासून ते लोकसभा पर्यंत भाजपने वर्चस्व निर्माण केले होते. तर सहापैकी चार आमदार हे भाजप पक्षाचे होते. यानंतर आताच्या विधानसभा निवडणुकीत सर्व चित्रच बदलले आहे. लातूर जिल्ह्यातील मतदारांनी सर्व प्रमुख पक्षांना समसमान कौल दिला आहे. त्यामुळे लातूर शहर आणि ग्रामीण मध्ये काँग्रेस तर औसा, निलंगा मतदारसंघात भाजपचे तर अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. असे असले तरी शिवसेनेचे अस्तित्व हे नगण्य आहे. यंदाच्या निवडणुकीत सहा पैकी केवळ लातूर ग्रामीणमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. याठिकाणीही तब्बल 1 लाख 20 हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे महाशिवआघाडी मध्ये जिल्ह्यात आमदार अमित देशमुख यांनाच अधिकचे महत्व राहणार आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात अस्तित्व टिकवून ठेण्यासाठी लढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला या सत्ता स्थापनेने नवसंजीवनी मिळणार आहे.

भाजपला आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादीला पुन्हा पक्ष मजबुतीसाठी ही सुवर्ण संधी राहणार आहे. मात्र, ही सर्व गणिते महाशिवआघाडीची सत्ता स्थापन झाल्यावरच शक्य आहेत, हे तेवढेच खरे....

ABOUT THE AUTHOR

...view details