लातूर -राज्यात काँग्रेस पक्षात असलेली मरगळ लातूर येथील मुलाखतीच्या दरम्यानही दिसून आली. पक्षाच्या वतीने काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या खऱ्या मात्र येथे इच्छुकांची उपस्थिती मात्र नगन्य दिसून आली.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातुरात इच्छुक उमेदवारींचीच वानवा काँग्रेसचा अपेक्षित उमेदवारच मुलाखतीला हजर
सकाळी १० च्या दरम्यान या मुलाखतींना सुरुवात झाली होती. आमदार अमित देशमुख यांची मुलाखत पार पडताच काँग्रेस भवन परिसरातील गर्दी ओसरण्यास सुरवात झाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातुरात इच्छुकांनीही फारसी गर्दी केली नव्हती.
लातूरात काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्यातील सहाही विधानसभेच्या अनुशंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लातूरात पार पडल्या. यावेळी पक्षाचे निरीक्षक माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश सरचटणीस कल्याण दळे, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी मुलाखती घेतल्या. लातूर शहरासाठी अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार अमित देशमुख, ताजजुद्दीन सय्यद, संजय बारस्कर यांनी तर लातूर ग्रामीणसाठी आ. त्र्यंबक भिसे, जि.प. सदस्य धीरज देशमुख, शिवाजी पाटील कवेकर, यास्मिन शेख यांनी हजेरी लावली होती. निलंगा मतदार संघासाठी नव्याने पक्षात दाखल झालेले अभय साळुंके, अशोक पाटील निलंगेकर आणि पंडित धुमाळ यांनी इच्छा व्यक्त केली होती तर इतर तीन विधानसभा मतदार संघातून उमेदवारांनी हजेरी लावली होती.