लातूर- गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेल्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे सरकारने त्वरित पंचनामे करून तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे सरपंच संघटनेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -काजरोळकर यांच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मिळणार वृत्तपत्रलेखनाचे धडे
लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात गेल्या महिना भरापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेल्या उभ्या व काढून ठेवलेल्या खरीप पिकांची मोठी हानी झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पावसाची सरासरी हजार, 900, 700 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, ज्वारी अशा उभ्या पिकांना अंकूर फुटले आहेत. तर, काढून ठेवलेल्या पिकांचे ढिग कुजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील आलेले पिके काढून दिवाळी साजरी करण्याऐवजी सावकाराकडून उसनवारी घेऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.