महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात जिल्हा प्रशासनाकडून डेड-लाईनचे पालन ; पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण - पिक नुकसान पंचनामे बातमी लातूर

हंगामाच्या सुरवातीपासूनच खरीप धोक्यात होता. सुरवातीला पाण्याविना पिके करपू लागली होती. तर ऐन काढणीच्या प्रसंगी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात साडे चार लाख शेतकऱ्यांना या नुकसानीला सोमोर जावे लागले. तब्बल ४ लाख ९० हजार हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत.

पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

By

Published : Nov 11, 2019, 11:37 PM IST

लातूर - खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसाने पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले होते. त्यामुळे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांचे बांध गाठले होते. ४ लाख ९० हजारहून अधिक हेक्टरावरील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले ओहत. आता प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

पिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

हेही वाचा-भीम अॅप प्रथमच चालणार विदेशातही; सिंगापूर आणि फिक्कीत सामंजस्य करार

हंगामाच्या सुरवातीपासूनच खरीप धोक्यात होता. सुरवातीला पाण्याविना पिके करपू लागली होती. तर ऐन काढणीच्या प्रसंगी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात साडे चार लाख शेतकऱ्यांना या नुकसानीला सोमोर जावे लागले. तब्बल ४ लाख ९० हजार हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बांध गाठला होता. शिवाय लोकप्रतिनीधींनीही पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना केल्याने केवळ १५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे. सर्वात अधिकचे नुकसान हे निलंगा तालुक्यातील झाले आहे. खरीप हंगामात सोयाबीन हे महत्वाचे पिक असून सर्वाधिक नुकसान हे या पिकाचेच झाले आहे. बाजरी, मका, मूग, उडीद या पिकांनाही फटका बसला असून मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खरीप हंगामाशी दोन हात करून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे या हंगामातील मशागत, पेरणी तसेच बि-बीयाणांसठी तरी त्वरीत मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाअधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details