महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात दुष्काळी परिस्थिती आटोक्यात - जिल्हाधिकारी - drought in latur

भविष्यात हीच स्थिती राहिली तर टँकरची संख्या शंभरावर जाईल. मात्र, टँकर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाणार नाही. मात्र, या टंचाईचा कोणी गैरफायदा घेऊ नये. यामुळे दुष्काळाची पाहणी करूनच उपाययोजना केली जात असल्याचे जी. श्रीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले

दुष्काळाबाबत बोलताना लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

By

Published : May 11, 2019, 11:23 AM IST

लातूर - जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने टँकर आणि अधिग्रहणाच्या प्रस्तावात वाढ होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी आटोक्यात आहे. मात्र, मागेल तिथे टँकर आणि अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल होताच. त्याला मंजुरी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याचे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.

दुष्काळाबाबत बोलताना लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

मे महिन्याच्या सुरुवातीपासून दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आता ६४ टँकरद्वारे ४९ गावांना आणि १३ वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे, तर ४८७ गावांसाठी ६०३ जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात पाणीटंचाईकडे थोड्याप्रमाणात दुर्लक्ष झाले असले तरी तालुकानिहाय बैठका घेऊन पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

पाणीटंचाईची पाहणी करून गरज असेल त्या ठिकाणी टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात स्थिती अधिक गंभीर असून उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरीत उतरून पाणी घेण्याची वेळ लातूरकरांवर येणार नाही. याची दक्षता घेऊन त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या हजारावर आणि चारा छावणीची संख्या शंभरावर गेली आहे. त्यामुळे दुष्काळ असला तरी परिस्थिती आटोक्यात आहे.

भविष्यात हीच स्थिती राहिली तर टँकरची संख्या शंभरावर जाईल. मात्र, टँकर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाणार नाही. मात्र, या टंचाईचा कोणी गैरफायदा घेऊ नये. यामुळे दुष्काळाची पाहणी करूनच उपाययोजना केली जात असल्याचे जी. श्रीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले

ABOUT THE AUTHOR

...view details