महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची बदली; पृथ्वीराज बी. पी. होणार रुजू

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची लातूर येथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची अकोला येथे बियाणे महामंडळाच्या व्यवसथापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली आहे.

जी. श्रीकांत
जी. श्रीकांत

By

Published : Dec 8, 2020, 3:28 PM IST

लातूर - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या बदलीवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा, सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. अखेर लातूर येथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची अकोला येथे बियाणे महामंडळाच्या व्यवसथापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांनी लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.

थेट कामाला प्राधान्य

साडेतीन वर्षाच्या काळात त्यांनी एक लातूरकर म्हणून काम केले होते. प्रशासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करून थेट कामाला प्राधान्य कसे देता येईल याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. प्रशासकीय यंत्रानेबरोबरच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमात त्यांनी दिलेले योगदान लातूरकरांच्या स्मरणात राहण्यासारखे आहे. अखेर मंगळवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून परभणीचे सीईओ पृथ्वीराज बी. पी. हे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

नियोजनबद्ध कारभार

मे 2017साली जी. श्रीकांत हे लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. दरम्यानच्या, काळात त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे लातूर पॅटर्नची वेगळी ओळख निर्माण झाली होती. प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेच्या मध्यभागी असणाऱ्या एजंटचा हस्तक्षेप त्यांनी सर्वात प्रथम बाजूला केला होता. जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे लातूरला राष्ट्रीय जल पुरस्कारही जी. श्रीकांत यांच्याच कार्यकाळात मिळाला होता. 2018साली लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणीपातळी ही मृतसाठ्यात गेली होती. त्यावेळी प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे लातूर शहरात एकही टँकर सुरू करण्याची नामुष्की ओढावली नाही तर याच वर्षात पाण्याअभावी गणपती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी गणेश मूर्तीचे विसर्जन नाही तर मूर्तीचे दान करण्याचे आवाहन त्यांनी सर्वच गणेश मंडळांना केले होते. त्यानुसार एक वेगळ पॅटर्न निर्माण झाला होता. गेल्या आठ महिन्यातील कोरोनाचा काळ हा त्यांच्यासाठी आव्हानात्मक होता. परंतु, प्रशासकीय यंत्रणेती अधिकारी-कर्मचारी यांच्या मदतीने त्यांनी परस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. शिवाय सलग 6 महिने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जनतेच्या संपर्कात राहिले होते.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणीवर त्वरित मात करता आली होती. केवळ प्रशासकीय यंत्रणेपूरतेच मर्यादित न राहता लव्ह लातूरचे ग्रुपचे ते अध्यक्ष होते. शिवाय सांस्कृतिक, क्रीडा नृत्य यासारख्या उपक्रमातून त्यांनी लातूरकरांची मने जिंकली होती.

बदलीच्या अफवा

गेल्या सहा महिन्यापासूनची अफवा अन आज बदलीजिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या बदलीवरून अनेक वेळा अफवाही उडाल्या होत्या. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. कोल्हापूर, पुणे या ठिकाणी बदली झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण आता त्यांची अकोला येथे बियाणे महामंडळाच्या रिक्त जागेवर बदली झाली असून तसे आदेशही देण्यात आले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम अन् क्रिकेटचे मैदानही गाजविले

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे शहरतीलच नव्हे तर जिल्ह्यात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवत होते. एवढेच नाही तरी क्रिकेटचे मैदानही त्यांनी गाजवले होते. क्रिकेट सामना जिंकल्यानंतर महसूल कर्मचारी यांच्याबरोबर केलेला डान्स लातूरकरांच्या कायम स्मरणात राहील, असा होता.

कोरोनाच्या काळातील आव्हाने आणि जी. श्रीकांत यांचे उपक्रम

कोरोनाच्या काळात दिवसाकाठी लातूर जिल्ह्यात 400 ते 500 रुग्ण आढळून येत होते. दरम्यान, रुग्णांची मानसिकता बदलण्यासाठी कोविड सेंटरमध्ये डान्सचा उपक्रम राबविला होता. यामुळे रुग्णांच्या मानसिकतेमध्ये बदल होण्यास उपयोग झाला होता. तर या काळात अँटी कोरोना पोलीस हा उपक्रम राज्यभर गाजला होता. या उपक्रमामध्ये दुसऱ्याच दिवशी13 हजार जवानांनी सहभाग नोंदवला होता. अखेर साडेतीन वर्ष लातूरमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची अकोला येथे बियाणे महामंडळ येथे बदली झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details