महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी केल्या १६ लाखांच्या दुचाकी चोरी; लातुरातील टोळीचा पर्दाफाश - लातूर बातमी

शिक्षण क्षेत्रात लातूरचा लौकिक संबंध राज्यात आहे. मात्र, याच शिक्षण प्रवाहातील विद्यार्थी सराईत गुन्हेगारांच्या प्रवाहात आल्यास काय होते याचा प्रत्यय आला आहे. नवीन वर्षाला सुरुवात होताच दुचाकी चोरीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील उपविभागीय पोलीस पथकाने शोध मोहिमेस सुरुवात केली.

collage-student-stolen-54-bike-police-arrested-6-accused-in-latur
collage-student-stolen-54-bike-police-arrested-6-accused-in-latur

By

Published : Jan 14, 2020, 5:45 PM IST

लातूर - केवळ मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करून मिळेत त्या किंमतीने त्यांची विक्री करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे यातील सहापैकी दोघेजण हे महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. त्यांनी १६ लाख २० हजारांच्या दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.

टोळीचा पर्दाफाश

हेही वाचा-विनयभंगाच्या आरोपानंतर नाशिकच्या डॉक्टरची आत्महत्या; सातव्या मजल्याहून मारली उडी

शिक्षण क्षेत्रात लातूरचा लौकिक संबंध राज्यात आहे. मात्र, याच शिक्षण प्रवाहातील विद्यार्थी सराईत गुन्हेगारांच्या प्रवाहात आल्यास काय होते याचा प्रत्यय आला आहे. नवीन वर्षाला सुरुवात होताच दुचाकी चोरीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील उपविभागीय पोलीस पथकाने शोध मोहिमेस सुरुवात केली. दरम्यान, यात मोठे रॅकेटच हाती लागले आहे. दीड वर्षांपासून लातूरसह उस्मानाबाद, नांदेड, जिल्ह्यातील दुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ४ जानेवारीपासून या पथकातील अधिकाऱ्यांनी तब्बल ५४ दुचाकी ताब्यात घेतल्या असून अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे.

अटक केलेल्यांपैकी सर्फराज उस्मान शेख आणि परवेज अजमोद्दीन मुजावर हे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. केवळ मित्रांचे वाढदिवस, पार्टी आणि मोबाईल खरेदी करण्यासाठी त्यांनी हा चोरीचा मार्ग निवडला होता. मिळेल त्या किंमतीने त्यांनी या दुचाकी लातूर जिल्ह्यातील नागरिकांना विकल्या आहेत. शिवाय कागदपत्रे जमा केल्यानंतर निम्मे पैसे द्या म्हणून ही टोळी पसार होत होती. अखेर शोधमोहीमेच्या ११ व्या दिवशी वेगवेगळ्या दोन टोळीतील सहाजणांना पोलिसांनी ताब्यात आहे. यात १६ लाख २० हजारांच्या दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, किरण पठारे, आर.बी.ढगे, वाहिद शेख, माधव बिलापटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details