लातूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनधिकृत फलकामुळे निलंगा येथील आगारप्रमुख अडचणीत आले आहेत. विना परवाना बसस्थानक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक लावण्यात आले असल्याने निलंगा पोलीस ठाण्यात आगारप्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोदींच्या फलकामुळे आगारप्रमुख अडचणीत; आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल - LATUR
'शत्रुच्या घरात घुसून आतंकवाद्यावर कठोर प्रहार...पुन्हा एकदा मोदी सरकार...' अशा आशयाचा फलक निलंगा बसस्थानक परिसरात लावण्यात आला आहे. सर्वाजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि आदर्श आचारंहितेचा भंग केल्याने आगारप्रमुख युवराज भानुदास थडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मोदींच्या फलकामुळे आगारप्रमुख अडचणीत; आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल
'शत्रुच्या घरात घुसून आतंकवाद्यावर कठोर प्रहार...पुन्हा एकदा मोदी सरकार...' अशा आशयाचा फलक निलंगा बसस्थानक परिसरात लावण्यात आला आहे. सर्वाजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि आदर्श आचारंहितेचा भंग केल्याने आगारप्रमुख युवराज भानुदास थडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंगा नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागप्रमुख रमेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई शनिवारी रात्री उशीरा करण्यात आली. पुढील तपास एपीआय सुरेश डांगे हे करत आहेत.