लातूर- संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त निलंगा शहरामध्ये आज स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात आले. जाकीर सामाजिक विकास संस्थे अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त निलंग्यात स्वच्छता मोहिम अभियान - birth anniversary of Saint Gadgebaba
निलंगा येथील बस स्टँडमध्ये सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त निलंग्यात स्वच्छता मोहिम अभियान
निलंगा येथील बस स्टँडमध्ये सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बस स्टँड येथील मंदिरासमोरील परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी जाकीर शेख,अब्बु सय्यद, ऋषिकेश पोद्दार, शिवम हरीश, बाहुले, राहुल पोद्दार, मुजमिल शेख, तुषार सोमवंशी, सचिन किनीकर, फयाज शेख उपस्थित होते.