लातूर - कोरोनाच्या संकटात अनेकांचे उद्योग-व्यवसाय डबघाईला आले आहेत. मात्र, नागरिकांच्या गरजा ज्यांनी ओळखल्या आणि वेगळा पर्याय उभा केला. त्यांनी या संकटावर मात तरकेलीच, शिवाय दुसऱ्यांसमोर आदर्शही उभा केला. असाच अनोखा उपक्रम कापड व्यावसायिक ओमप्रकाश सारडा यांनी लातुरात राबविला आहे.
कोरोना संकटात शोधली नवी संधी... सामाजिक संस्थेच्या सहाय्याने उभारला 'चिंच कँडी' व्यवसाय - लाॅकडाऊन लातूर बातमी
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्याने उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकजण अडचणीत सापडले आहेत. त्यापैकीच लातुरातील ओमप्रकाश सारडा. त्यांनाही आपले कापड दुकान बंद ठेवावे लागले होते.
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्याने काही उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकजण अडचणीत सापडले होते. त्यापैकीच लातुरातील ओमप्रकाश सारडा. त्यांनाही आपले कापड दुकान बंद ठेवावे लागले होते. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांना सोशल मीडियावर 'वाटाड्या' या सामाजिक संस्थेची माहिती मिळाली.
यामधूनच सारडा यांनी चिंचेपासून बनवली जाणारी 'चिंच कँडी' घरच्या घरी बनवायला सुरवात केली. ओमप्रकाश यांच्या पत्नीही या व्यवसायात त्यांना मदत करतात. या व्यवसायामुळे सारडा यांच्या हाताला काम तर मिळलेच, शिवाय दिवसाकाठी हजार रुपयेही त्या व्यवसायातून मिळत आहेत. या उद्योगाचे स्वरूप लहान का असेना, प्रतिकूल परिस्थितीत सारडा दाम्पत्याने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आणि तो यशस्वीही करून दाखविला. याकरिता वाटाड्या सामाजिक संस्थचे सहकार्य लाभले असले तरी, हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सारडा दाम्पत्याचे परिश्रम कामी आले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक विचार आणि वेगळी वाटचाल, याचा कसा परिणाम होतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.