लातूर - औसा रोडवरील बुधोडा शिवारातील ओमेक्स ऍग्रो कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. टायर जाळून केमिकल तयार करणाऱ्या युनिटमध्ये सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
लातूरमध्ये केमिकल कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोघांचा मृत्यू
महताब बाबू शेख आणि उदयराज रावत अशी स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनासाठी दाखल झाल्या होत्या.
मेहताब शेख आणि उदयराज रावत अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. लिंबोळीपासून खत निर्मितीचा कारखान्यातच ओमेक्स ऍग्रोमध्ये जुने टायर जाळून केमिकलही तयार करण्यात येत होते. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता या बॉयलरचे तापमान वाढल्याने या बॉयलरचा स्फोट झाला. त्यावेळी या ठिकाणी काम करणारे मेहताब शेख आणि उदयराज रावत या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याआगोदर या कारखान्यात गेल्यावर्षी झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबरच टायर जाळण्यामुळे या ठिकाणी कायमच धूर पसरलेला असतो, अशी तक्रार केल्यानंतरही कारखान्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार बुधोडा ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्याबरोबरच घटनेची माहिती मिळताच औसा शहर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याप्रकणी पोलीस पुढील तपास करत आहेत.