लातूर -सध्या युतीबाबत सकारात्मक चर्चा असली तरी हक्काच्या जागेवर शिवसेना दावा करीत आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले असून ऐनवेळी वेगळा निर्णय झाल्यास आम्हाला केवळ एका आदेशाची आवश्यकता असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. ते सोमवारी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा - शरद पवार ...तर लोकसभा लढवणार नाही -उदयनराजे झाले भावूक
राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सगळेच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अद्यापही अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील औसा आणि लातूर शहर हे परंपरागत मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यंदाही हे मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत म्हणून कार्यकर्त्यांचा रेटा आहे. या मतदारसंघात अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर झाले नसले तरी पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.