लातूर - शिवजयंतीनिमित्त आज (बुधवारी) शहरात दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. मात्र, याची सुरुवात झाली ती नऊवारी वॉक स्पर्धेने. शहरातील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवला होता. राज्याच्या संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अखेरीस हजारोच्या संख्येने महिला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्या.
महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन; लातूरमध्ये 'नऊवारी वॉक स्पर्धे'ने शिवजयंती साजरी हेही वाचा -नांदगावच्या शिक्षिकेची अनोखी शिवभक्ती, महाराजांचा पुतळा स्वच्छ करून दिवसाची सुरुवात
शिवजयंतीनिमीत्त लातुरात आज एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. 'नऊवारी साडी वॉक' असे या स्पर्धेचे नाव होते. या स्पर्धेत शहरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. राज्याच्या संस्कृतीत नऊवारी साडीला अनन्यसाधारण महत्व आहे. याचाच भाग म्हणून आज विविध वयोगटातील महिला या स्पर्धेत दाखल झाल्या. 3 किलोमीटर सुरू झालेली ही स्पर्धा शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन विसावली. यावेळी तीन वेगवेगळ्या गटामधून विविध पारितोषिके देण्यात आली.
हेही वाचा -Exclusive:..बारावीच्या परीक्षेला आले 74 वर्षांचे आजोबा!