महाराष्ट्र

maharashtra

ईटीव्ही भारत विशेष: कोरोनाबाबत खासगी रुग्णालयात 'अशी' घेतली जातेय खबरदारी..

By

Published : Jul 3, 2020, 3:03 PM IST

लातूर शरहातील अत्यावश्यक असलेल्या रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवेचा घटक म्हणून खासगी रुग्णालये सुरू झाली आहेत. पण यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याकरिता राज्यसरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे.

caution-is-taken-in-a-private-hospital-for-corona-virus-in-latur
कोरोनाबाबात खासगी रुग्णालयात 'अशी' घेतली जातेय खबरदारी..

लातूर- लॉकडाऊननंतर देशात अनलॉक 2 सुरू करण्यात आले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आजही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत रुग्णालयांनी काय, उपाययोजना केली आहे याबाबत 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला आहे.

कोरोनाबाबात खासगी रुग्णालयात 'अशी' घेतली जातेय खबरदारी..

लातूर शहरातील अत्यावश्यक असलेल्या रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवेचा घटक म्हणून खासगी रुग्णालये सुरू झाली आहेत. पण यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याकरिता राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. काही रुग्णालयात तर कोरोनापासून बचावाचे किट रुग्णांना मोफत दिले जात आहे.

लातूर येथे केवळ जिल्ह्यातूनच नाही तर सबंध मराठवाड्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी रुग्णालयांना मुभा देण्यात आली आहे. या सार्वजनिक ठिकाणाहून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजीही घेतली जात आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच आत येणाऱ्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. रुग्णालयात येणाऱ्यांचे तापमान तपासले जात आहे. तर जागोजागी कोरोनाबाबत घेणात येणाऱ्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचनाचे फलक लावले आहेत.

लातुरात मध्यंतरी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता रुग्णालयामध्ये अधिकची खबरदारी घेतली जात आहे. एका विशिष्ट अंतरावर बैठक व्यवस्था, मस्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना फेशशिल्ड, हॅन्डग्लोज, मास्क हे मोफत दिले जात आहेत.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच उपचारासाठी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. शहरातील पोद्दार हॉस्पिटलमध्ये तर रुग्ण दाखल होताच सॅनिटायझर, साबण, मास्क अशाप्रकारचे किट दिले जात आहे. आतापर्यंत 600 हून अधिक रुग्णांना याचे वाटपही केले आहे.

दिवसाकाठी 100 हून अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पोद्दार हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळे रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने स्टाफ वाढविण्यात आला आहे. शहरातील केवळ एका रुग्णालयात नाही तर सर्रास खासगी रुग्णालयात ही खबरदारी घेतली जात आहे. शिवाय केवळ ओपीडीच नाही आयपीडी देखील सुरू करण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांची वेळोवेळी बैठका घेऊन रुग्णालयातील सुरक्षिततेबाबत नियोजन आखले जात आहे. या नियोजनाची केवळ औपचारिकता नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. इतर सार्वजनिक ठिकाणीही अशाप्रकारे काळजी घेणे गरजेचे झाले आहे. लहान रुग्णालयात या नियमांचे तंतोतंत पालन होत नसले तरी ज्या रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक आहे त्याठिकाणी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details