निलंगा (लातूर) - निलंगा तालुक्यातील जाऊ येथील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी, आम्ही दिलेले तपासणीचे रिपोर्ट का येत नाहीत. तुम्ही वारंवार आमचे नमुने का घेता, असे म्हणून चक्क तहसीलदाराच्या अंगावर धाव घेतली होती. त्यामुळे तहसीलदारांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घातल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शुक्रवारी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जाऊ येथील वस्तीगृह प्रशासनाने विलगीकरणासाठी घेतले आहे. या विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सध्या येथे बाधित रुग्णांच्या संपर्कातील ५२ जण आहेत. या विलगीकरण कक्षाला निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास भेट दिली. तेथील मुस्तफा खुर्शीद लष्करे, आरिफ खुर्शीद पटेल, आतीक खाजा पटेल (रा.औराद शहाजानी) सय्यद शाकीब दुरानी, सय्यद सुभानी समदानी खान (रा. निलंगा) या पाच जणांनी आमचा तपासणीस पाठवलेला रिपोर्ट का येत नाही. तुम्ही वारंवार आमची तपासणीचे नमुने का घेता, म्हणून मारहाण करण्याच्या उद्देशाने तहसीलदार गणेश जाधव यांच्या अंगावर धावून गेले.
हेही वाचा -'कोरोनाची गंभीर लक्षणे आणि रुग्णाचा रक्तगट याचा संबंध नाही'