लातूर - येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन एमआयडीसी येथील ऑइल कंपनीत नेले जात आहे. दरम्यान, बार्शी रोडवरील उड्डाण पुलावर काही तरुण हे वाहनधारकाशी हुज्जत घालत असत व काहीजण मागच्या बाजूने सोयाबीनचे पोती काढून घेत होते. एवढेच नाही तर उड्डाण पुलाला लागून असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये सोयाबीनची साठवणूक केली जात होती. अखेर बुधवारी (दि. 2 डिसेंबर) पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवड्यात सर्वात मोठी सोयाबीनची बाजारपेठ ही लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. दिवसाकाठी 30 ते 40 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन रात्री-अपरात्री एमआयडीसी येथील विविध ऑइल कंपनीत नेले जात होते. गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळे रात्रभर सोयाबीनची वाहतूक ही सुरूच होती. याचाच फायदा घेत काही तरुण बार्शी रोडवरील उड्डाणपुलावर वाहनाचा वेग मंदावला की वाहनचालकाशी हुज्जत घालत तर काहीजण मागच्या बाजूने सोयाबीन काढून घेत असत. त्यामुळे ऑइल कंपनीत वाहनाचे वजन हे कमी भरत होते. पण, यामध्ये नेमके काय होत आहे याचा अंदाज येत नव्हता.
मंगळवारी हा प्रकार आला निदर्शनास
मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) मध्यरात्री या पुलावर वाहांचालकाशी हुज्जत घालत असताना एका वाहनचालकाच्या निदर्शनास आले की ट्रकमधून सोयाबीनचे पोती काढले जात आहेत. मात्र, रात्री एकट्याने धाडस न करता ऑइल कंपनीतील सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला आणि सर्वकाही उघडकीस आले. याच पुलावर सोयाबीन काढून घेतले जात होते तर लगतच असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये ते साठवून ठेवले जात होते. दुसऱ्या दिवशी याच सोयाबीनची विक्री करून हे तरुण हजारो रुपये मिळवत होते. पण, मंगळवारी रात्री हा सर्व प्रकार निदर्शनास आला असून वाहेद शेख (वय 38 वर्षे) यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन तासांमध्ये हजारोंची मिळकत