महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : 'मॉर्निंग वॉक'ला निघालेल्या 80 जणांविरोधात गुन्हा दाखल - curfew rules in latur

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी सुरु आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केला जात आहे. पण, अनेक लोक अजूनही बाहेर पडून फिरत आहेत. अशाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताब्यात घेतलेले नागरिक
ताब्यात घेतलेले नागरिक

By

Published : Apr 3, 2020, 12:36 PM IST

लातूर- मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू आहे. असे असताना आज (दि. 3 एप्रिल) सकाळी घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक करणारे तब्बल 80 जण थेट पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. काल 'मी लातूरचा दुश्मन, मला लातूरकरांची चिंता नाही' अशाप्रकारे फलक हातात देऊन बाहेर फिरणाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. तरीही आज नागरिक घराबाहेर पडले होते. विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात सर्वांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संवाद साधताना प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रीचा दिवस करीत आहे. असे असतानाही संचारबंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही. दोन दिवसांमध्ये एमआयडीसी आणि शिवाजी नगर ठाण्यात तब्बल 150 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. असे असताना आज विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विकास तिडके यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 78 जणांना ताब्यात घेतले आहे.

यांच्यावर 188, 269, 270 या कलाम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुदैवाने लातुरात एकही कोरोनाग्रस्त नाही. मात्र, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असताना अशाप्रकारे दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस यंत्रणा कडक धोरण अवलंबित असली तरी लातूरकरांनी त्यांना साथ देणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा -'मॉर्निंग वॉक'ला निघाले अन् पोलीस ठाण्यात पोहोचले, लातुरात 120 जणांविरोधात गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details