लातूर - उदगीर तालुक्यातील दावनगाव आणि कुमदाळ शिवाराच्या हद्दीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह काटेरी झुडपात टाकण्यात आला होता. या घटनेनंतर परिसतरात खळबळ उडाली असून आद्यप मृताची ओळख पटलेली नाही.
उदगीरमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला; पुरावे मिटवण्यासाठी जाळल्याचा संशय
उदगीर तालुक्यातील दावनगाव आणि कुमदाळ शिवाराच्या हद्दीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह काटेरी झुडपात टाकण्यात आला होता. या घटनेनंतर परिसतरात खळबळ उडाली असून अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आलाय. संबंधित व्यक्तीचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दावनगाव येथील पोलीस पाटील भद्र शेट्टे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.
मात्र, अद्याप या प्रकरणाबाबत अस्पष्टता असून पुढील तपास सुरू आहे.