लातूर - निलंगा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. जोरदार पावसाचा फटका शेतीसह जनजीवनावर झाला आहे. तालुक्यातील हणमंतवाडीत दोन दिवसांपासून प्रेत अंत्यसंस्कार अभावी तसेच आहे. गावात स्मशान शेड नसल्याने गावकऱ्यांसह कुटुंबीयांची तारांबळ उडाली आहे.
लातूर : पाऊस त्यात स्मशानात शेड नाही! दोन दिवसांपासून प्रेत घरातच - निलंगा हणमंतवाडी
निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीत दोन दिवसांपासून प्रेत अंत्यसंस्कार अभावी तसेच आहे. गावात स्मशान शेड नसल्याने गावकऱ्यांसह कुटुंबीयांची तारांबळ उडाली आहे.
निलंगा तालुक्यातील हणमंतवाड़ी येथे रंगराव सुर्यवंशी या व्यक्तीचे मंगळवारी 10 वाजता निधन झाले. गावात ग्रामपंचयतीची स्मशानभुमीत शेड नाही. त्यामुळे प्रेत दोन दिवसापासून घरातच ठेवण्याची वेळ आली आहे. पाऊस कधी कमी होतो, याची वाट ग्रामस्थ पाहत आहेत.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औराद, तगरखेडा, चांदाेरी, बाेरसुरी, सावरी, साेनखेड, शेळगी, हलगरा, हालसी, लिंबाळा, मदनसुरी, वांजरखेडा आदी गावात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.शेतमाल खराब झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे. याशिवाय वीज पुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.