महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपची यात्रा जनसमुदायात अन् विरोधकांची मंगल कार्यालयात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाजनादेश यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यात आहेत. 5 वर्षात सरकारने केलेली विकास कामे आणि विरोधकांचे अपयश यावरच त्यांनी जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 31, 2019, 8:44 PM IST

लातूर- गेल्या 5 वर्षात सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जन आशीर्वाद घेण्याच्या अनुषंगाने ही महाजनादेश यात्रा काढली जात आहे. भाजप सरकारने संवाद यात्रा काढल्यानंतर अनेकांनी यात्रा काढण्याचा घाट घातला आहे. मात्र, भाजपाची यात्रा जनसमुदायात तर विरोधकांच्या यात्रा ह्या मंगलकार्यालयात,अशी अवस्था असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शनिवारी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर येथे जाहीर सभा पार पडल्या त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा-लातुरात मुख्यमंत्र्यांची सभा 'जनरेटर'वर अन् तयारी 'आकड्यावर'


महाजनादेश यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यात आहेत. 5 वर्षात सरकारने केलेली विकास कामे आणि विरोधकांचे अपयश यावरच त्यांनी जनतेशी संवाद साधला. 15 वर्षात निवडणुकांसाठी असलेली ईव्हीएम मशीन आताच कशी बदलण्याची वेळ आली. निवडणुकांतील अपयश लपविण्यासाठी हा मुद्दा समोर केला जात आहे. जनता हेच दैवत मानून मोदी सरकार काम करीत आहे. संघर्षांनंतर संवाद यात्रा ही भाजपाची परंपरा आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात मोदीच असल्याने दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. आतापर्यंत 5 वर्षाच्या कालावधीत लातूरकरांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या आहेत. भविष्यातही कामाची संधी द्याल, अशी अपेक्षा असून जन आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही यावेळी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. हात्तीबेट मंदिराच्या विकासासाठी यावेळी 10 कोटींची त्यांनी मागणी मुख्यमंत्री यांना केली. आमदार सुधाकर भालेराव यांनीही विकसकामाबाबत केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले. दरम्यान, शहरात मुख्यमंत्री यांचे आगमन होताच विधानसभेसाठी विविध गटातील बॅनरबाजीने अंतर्गत मतभेद दिसून आले. मात्र, उमेदवरीबाबत कोणत्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी केला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details