लातूर- सबंध राज्यात भाजपकडून राज्य सरकारच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन केले जात आहे. लातूरकरांसाठी उजनी पाणी प्रश्न महत्वाचा आहे. मात्र, ही समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून कुठलीही कृती होत नसल्याने भाजकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सत्तांतरानंतर आज पहिल्यांदाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर आंदोलन केले आहे.
लातूरमध्ये भाजपचे पालकमंत्र्यांविरोधात धरणे आंदोलन; दिशाभूल केल्याचा आरोप - ujni water problem
सत्ता आली तर दोन महिन्यात लातूरला पाणी देऊ असे आश्वसन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूरकरांना दिले होते. मात्र, चार महिने लोटले तरी यासंबंधी अभ्यासच सुरू असल्याचे सांगत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी भाजप आंदोलनकर्त्यांनी केला.
सत्ता आली तर दोन महिन्यात लातूरला पाणी देऊ असे आश्वसन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूरकरांना दिले होते. मात्र, चार महिने लोटले तरी यासंबंधी अभ्यासच सुरू असल्याचे सांगत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. शिवाय, शहराला गेल्या १५ दिवसांपासून वीज बिल अदा न केल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्ह्याचा कारभार हाकण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख आणि राज्याचा कारभार चालवण्यासाठी महाविकास आघाडी असमर्थ ठरत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. जिल्ह्यातील दहा ठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी लातूर तहसील कार्यालयासमोर खा. सुधाकर श्रंगारे, जिल्हाध्यक्ष रमेश कराड, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, शैलेश लाहोटी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा-'पोकरा' योजना शासनानेच पोखरली; अर्जांना पूर्वसंमती न देण्याचे आदेश