लातूर -आमदार निलंगेकर यांच्या फेसबुक पोस्टवरती एका जणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत अपमानजनक वक्तव्य केले. याप्रकरणी जनभावना दुखावल्याबद्दल भाजप निलंगाच्या वतीने सदर व्यक्तीविरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवर मोदींबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - nilanga police station news
आमदार निलंगेकर यांच्या फेसबुक पोस्टवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![फेसबुकवर मोदींबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आ. निलंगेकर याच्या फेसबुक पोस्टवरती देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर अत्यंत अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या विरोधात निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:45:25:1594286125-mh-ltr-news04-yevatmalchayuvkavarnilangyatguhnadakhal-photo-10054-09072020144425-0907f-1594286065-911.jpg)
सदर माहितीनुसार आमदार निलंगेकर यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या फेसबुकवर 'मी भक्त' अशी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर जाऊन यवतमाळ येथील रहिवासी सतिश पोटकर पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल अपमान जनक व गलिच्छ शब्दात लिखाण केले होते. या लिखाणाचा निषेध व्यक्त करत भाजप निलंगा यांच्या वतीने निलंगा पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीची तत्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप निलंगा यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.