लातूर - महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यास आलेल्या राजकीय नेत्यांनी पक्षांचा अजेंडा कायम ठेवला. शुक्रवारी सकाळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृषी कायद्याला आणि राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले.
लातुरात भाजप-काँग्रेस समोरासमोर यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कृषी कायद्याच्या समर्थनार्थतील शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाचे नेते एकाच वेळी एका ठिकाणी आले असले तरी, त्यांचे अजेंडे हे वेगळे होते.
लातुरात भाजप-काँग्रेस समोरासमोर हेही वाचा -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला नागपुरात पदोन्नती उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे गुरुवारी राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास निघाले असता, त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अटकही करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर काँग्रेसची आंदोलने होत आहेत. अशाच प्रकारे लातूर येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू होते. मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेची कशी लूट सुरू आहे, शिवाय देशात लोकशाही नसून हुकूमशाहीचा उदय होत असल्याच्या घोषणाबाजी पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
भाजपचेही पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने घोषणाबाजी सुरू झाली. एकंदरित आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्ष गांधी चौकात एकाच ठिकाणी आले, पण आपापले अजेंडे घेऊन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केवळ अभिवादन करण्यात आला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसच्या आंदोलनातही सहभागी झाले नाहीत, हा विषय चर्चेचा बनला होता.
एकीकडे, कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा आहे, हे पटवून दिले जात होते. तर दुसरीकडे, काँग्रेसचे पदाधिकारी मोदी सरकार देशासाठी कसे घातक आहे, हे सांगत होते. ज्या महात्मा गांधी यांनी शांततेचा संदेश दिला, त्यांच्या जयंतीदिवशीच असा प्रकार लातूरकरांच्या अनुभवाला आला.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले...