महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर शहर मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेसपेक्षा वंचितसोबत अधिक - शैलेश लाहोटी - लातूर शहर विधानसभा

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असलेले शैलेश लाहोटी यांनी, यावेळी आपला प्रतिस्पर्धी हा काँग्रेस नसून खरी लढत वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, असे बोलत काँग्रेसला वेगळ्या पद्धतीने आव्हान दिले आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ

By

Published : Oct 5, 2019, 2:22 PM IST

लातूर - शुक्रवारी भाजप उमेदवार शैलेश लाहोटी यांनी शक्तिप्रदर्शन करत लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेस हा माझा प्रतिस्पर्धी नसून खरी लढत ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराबरोबर असल्याचे लाहोटी यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपकडून काँग्रेसला यावेळी वेगळ्या पद्धतीने आव्हान दिले गेले आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून शैलेश लाहोटी रिंगणात

हेही वाचा... लातूरच्या तरुणाईचा सरकारकडून अपेक्षाभंग; बेरोजगारी, शैक्षणिक समस्या आजही कायम

लातूर शहरासाठी उमेदवारी कोणाला यावरून गेल्या अनेक दिवसांपासून तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर अमित देशमुख यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी यांनाच रिंगणात उतरवले गेले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लाहोटी यांच्या सोबत बातचीत केली असता त्यांनी, गेल्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाकडे सत्ता नसल्याने त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही. काँग्रेसकडे मुद्देच नसल्याने आपल्याला ही निवडणूक सोपी आहे. शिवाय माझी खरी लढत वंचित आघाडी सोबत आहे. असे मत लाहोटी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा... औस्यात भाजपकडून अभिमन्यू पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल; भर पावसात शक्तिप्रदर्शन

शुक्रवारी लाहोटी यांनी आपल्या समर्थकांसह लातूर तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून या वेळेस आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत, असेही शैलेश लाहोटी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... लातूर शहरातील अपक्ष उमेदवाराची शक्कल, अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ

ABOUT THE AUTHOR

...view details