निलंगा (लातूर) -केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या स्थगितीच्या निषेधार्थ निलंग्यात भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची होळी करत भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.
कृषी कायद्याला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून निलंग्यात आंदोलन - निलंग्यात भाजपचे आंदोलन बातमी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून स्थगिती देण्यात आली आहे. याचा निषेध नोंदवत निलंग्यात उपविभागीय कार्यालयासमोर भाजपने स्थगिती आदेशाची होळी केली.
आंदोलक
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, माजी सभापती अजित माने, जिल्हा सरचिटणीस तानाजी बिरादार, जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष वाघमारे, तालुका प्रभारी अशोक वाडीकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा -आस्मानी-सुलतानी संकटानंतरही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच; वर्षभरापासून दरही स्थिरच