महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उदगीर मतदारसंघ : विरोधात प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपची कारवाई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

ऐन निवडणुकीच्या तोंडावर औसा, अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघात भाजपच्या गोटात अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. याचाच परिणाम निकलावरही झाला असून अहमदपूर आणि उदगीर या हातच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या. उदगीर प्रमाणेच औसा मतदारसंघातही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बजरंग जाधव व इतरांवर कारवाई करण्यात आली आहे.

उदगीर विधानसभा निवडणूक

By

Published : Nov 12, 2019, 5:28 PM IST

लातूर- जागा वाटपावरून विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये अंतर्गत मतभेद टोकाला गेले होते. यामधूनच काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन प्रचारही केला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जिल्हा उपाध्यक्षासह इतर 5 जणांचे निलंबन केले आहे.

हेही वाचा - लातुरात जिल्हा प्रशासनाकडून डेड-लाईनचे पालन ; पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

ऐन निवडणुकीच्या तोंडावर औसा, अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघात भाजपच्या गोटात अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. याचाच परिणाम निकलावरही झाला असून अहमदपूर आणि उदगीर या हातच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या. उदगीर प्रमाणेच औसा मतदारसंघातही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बजरंग जाधव व इतरांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -लातुरमध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिला उतरल्या रस्त्यावर, मोर्चा काढत केला पोलिसांचा निषेध

निवडणुका होऊन 3 आठवड्यानंतर उदगीर येथील जिल्हा उपाध्यक्ष धर्मपाल देवशेट्टे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंदन नागरगोजे, जळकोटचे नगरसेवक शिवानंद देशमुख, खादर लाटवाले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र देण्यात आले आहे. या दोन्ही मतदारसंघातील पराभव हा पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमुळेच हा पराभव झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details