लातूर - अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने निलंगा शहराजवळच्या भिल्ल वस्तीने जात पंचायतीला मूठमाती दिली आहे. या जात पंचायतीने वस्तीवरील गानंगुळे कुटुंबाला बहिष्कृत करुन त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे गानंगुळे कुटुंबाने अंनिसच्या माध्यमातून शासनाकडे धाव घेतली. यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. जात पंचायत बंद करत असल्याचे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निलंग्यातील भिल्ल समाजाने दिली जात पंचायतीला मूठमाती, जिल्हाधिकाऱ्यांना दिले शपथपत्र - निलंगा
भिल्ल वस्तीवरील गोविंद गानंगुळे यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने बहिष्कृत केले होते. तसेच, त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे गानंगुळे कुटुंबाला वस्ती सोडावी लागली होती. गोविंद यांच्या पत्नी अंबिका यांनी त्रासाला कंटाळून दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
भिल्ल वस्तीवरील गोविंद गानंगुळे यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने बहिष्कृत केले होते. तसेच, त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे गानंगुळे कुटुंबाला वस्ती सोडावी लागली होती. गोविंद यांच्या पत्नी अंबिका यांनी त्रासाला कंटाळून दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या गानंगुळे कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे धाव घेतली.
अंनिसचे कार्यकर्ते माधव बावगे यांनी जात पंचायतीच्या पंचांचे प्रबोधन केले. त्यामुळे ही जात पंचायत कायमची बंद करण्याचा निर्णय लक्ष्मण गंगाराम विभूते, दशरथ काशिनाथ विभूते या पंचांनी घेतला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मंगळवारी पंचायत बंद करत असल्याचे शपथपत्र पंचांकडून देण्यात आले. यापुढे जात पंचायत झाल्यास कारवाई केली जाणार असल्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, विकासाच्या कामाच्या बाबतीत पंचायत भरवू शकता असेही सांगितले.