महाराष्ट्र

maharashtra

मराठा आरक्षण : आता मूक नव्हे तर ठोक मोर्चा; लोकप्रतिनिधींच्या घरासमोर करणार घंटानाद आंदोलन

By

Published : Sep 13, 2020, 3:34 PM IST

Updated : Sep 13, 2020, 4:14 PM IST

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आता ठिकठिकाणी बैठका पार पडत आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे, भूमिका मराठा समाजाच्या नेत्यांनी घेतली आहे.

maratha reservation meeting latur
मराठा आरक्षण बैठक लातूर

लातूर -भविष्यात मराठा समाजाची भूमिका मूक मोर्चासारखी नाही तर ठोक राहणार आहे. त्याचअनुषंगाने 16 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे भगवान मकने यांनी दिली.

मराठा आरक्षण : आता मूक नव्हे तर ठोक मोर्चा; लोकप्रतिनिधींच्या घरासमोर करणार घंटानाद आंदोलन

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका पार पडत आहेत. आता मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करू लागला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. रविवारी समाजातील नागरिकांनी एका मंगल कार्यालयात बैठक घेतली. आतापर्यंत राजकीय नेत्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या समाजाच्या नावाने मताचा जोगवा मागितला. मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. त्याच समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे, हे दुर्दैव आहे. भविष्यात आता तरूणांनी आत्महत्येसारखा विचार न करता लढण्याची भूमिका घ्यायला पाहिजे, असा सूर या बैठकीत उमटला. तसेच 16 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या घरासमोर घंटानाद केला जाणार आहे. याची सुरुवात पालकमंत्री अमित देशमुख यांच्यापासून केली जाणार आहे. माजी पालकमंत्री यांच्या घरासमोरही आंदोलन केले जाणार आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षण प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक - अशोक चव्हाण

रविवारी पार पडलेल्या बैठकीत समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या सूचनांची नोंद यावेळी घेण्यात आली आणि आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार आहे, असे मत अनेकांनी मांडले.

Last Updated : Sep 13, 2020, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details