महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवसेनेच्या पुढाकारातूनच महाविकास आघाडी नावारुपाला' - बाळासाहेब थोरात लातूर बातमी

सरकार स्थापनेनंतर आज प्रथमच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नागरी सत्कारानिमित्त लातुरात दाखल झाले होते. यावेळी सरकार स्थापनेदरम्यान झालेल्या बारीक-सारीक घडामोडी थोरात यांनी मांडल्या.

balasaheb-thorat-comment-on-mahavisaghadi-goverment-in-latur
balasaheb-thorat-comment-on-mahavisaghadi-goverment-in-latur

By

Published : Jan 27, 2020, 8:12 AM IST

लातूर- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता त्यावेळच्या घडामोडी नव्याने समोर येत आहेत. या सरकार स्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरली होती. काँग्रेस साथ देईल की नाही याची सुतभरही कल्पना नसताना शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवण्यासाठी उचलले पाऊल हे या सरकार स्थापनेसाठी महत्वाचे ठरले, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

हेही वाचा-केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार

सरकार स्थापनेनंतर आज प्रथमच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नागरी सत्कारानिमित्त लातुरात दाखल झाले होते. यावेळी सरकार स्थापने दरम्यान झालेल्या बारीक-सारीक घडामोडी थोरात यांनी मांडल्या. जनेतेच्याच नव्हे तर आमच्याही ध्यानीमनी नसताना या सरकारची स्थापना झाली आहे. मात्र, शिवसेनेने त्यावेळी घेतलेली भूमिका महत्वाची होती. हे आपल्याला मान्यच करावे लागणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

मित्रपक्षाला बाजूला सारून काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार की नाही याची कसलीही कल्पना नसताना त्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकशाहीचे जतन होत असल्यास गैर काय असे म्हणत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याला परवानगी दिली, असेही थोरात म्हणाले.

तर शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी परवानगी दिली असली, तरी मंत्रिपद आणि पालकमंत्री पद देण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच पुढाकार घेतल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. नागरी सत्कार समितीच्यावतीने रविवारी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार धीरज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details