महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औशात आघाडीकडून 'बसवराज'; युतीमध्ये मात्र अंतर्गत वाद, उत्सुकता शिगेला

निवडणुकांना अवकाश असला तरी औसाचा राजकीय फड चांगलाच रंगला आहे. निवडणुकांपूर्वीच्या तिकीट वाटपावरून औसा मतदारसंघाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Sep 17, 2019, 4:06 PM IST

Updated : Sep 18, 2019, 11:56 PM IST

लातूर-निवडणुकांपूर्वीच्या तिकीट वटपावरून औसा मतदार संघाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आघाडीकडून विद्यमान आमदार बसवराज पाटील हेच उमेदवार निश्चित मानले जात असले तरी युतीमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता आहे.

निवडणुकांना अवकाश असला तरी औसाचा राजकीय फड चांगलाच रंगला आहे

परंपरागत हा मतदारसंघ सेनेकडे आहे. मात्र, यंदा मुख्यमंत्र्यांचे स्वीयसहाय्यक अभिमन्यू पवार यांनी युतीकडून दावा केला असून गेल्या तीन वर्षापासून तयारीही सुरू केली आहे. पालकमंत्री यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे देखील इच्छुक असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी आणि माजी आमदार दिनकर माने यांनीही तयारी सुरू केल्याने उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

लातूर शहरापासून अवघ्या 22 किमी अंतरावर असलेल्या औसा मतदार संघात गेल्या दोन टर्मपासून काँग्रेसचे बसवराज पाटील हे आमदार आहेत. 2014 च्या मोदी लाटेत देखील भाजपचे उमेदवार पाशा पटेल यांचा त्यांनी परावभव केला होता. या निवडणुकीत आमदार बसवराज पाटील यांना 64 हजार 237 मते तर शिवसेनेचे दिनकर माने यांना 55 हजार 7379 मते मिळाली होती. 8 हजार 858 मतांनी बसवराज पाटील यांनी बाजी मारली होती.

हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?

गेल्या 5 वर्षात या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. त्याचे परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. हा मतदारसंघ लोकसभेसाठी उस्मानाबाद मतदारसंघात असला तरी येथून शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल 54 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्विसहाय्याक अभिमन्यु पवार हेच इच्छुकांच्या यादीत आहेत. एवढेच नाहीतर गेल्या तीन वर्षापासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. असे असताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षामधूनच अंतर्गत विरोध होऊ लागला आहे.

औसा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील 68 गावांचा होसमावेश तो. त्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचीही राजकारणात एन्ट्री याच मतदार संघातून दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी सर्वच इच्छुकांनी आपल्या स्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. असे असताना हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी आमदार दिनकर माने आणि जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी हे दावा करीत आहेत. तिकीट कुणालाही मिळो मात्र, अंतर्गत गटबाजीचा फटका युतीलाच होणार हे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा -संगमनेर विधानसभा आढावा : विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?

उलट दुसरीकडे 5 वर्षातील कामे आणि मतदारसंघात बसवराज पाटील यांची प्रतिमा चांगली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फारसा प्रभाव या मतदारसंघावर दिसुन येत नाही. मात्र, मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदार राजावर बरेच काही अवलंबून आहे.

निवडणुकांना अवकाश असला तरी औसाचा राजकीय फड चांगलाच रंगला आहे. युतीमधून उमेदवारीचा रंग कोण उधळणार हे अद्याप न सांगता येणार कोडे आहे, हे नक्की. मतदारसंघातील दोन्हीही साखर कारखाने बुडीत निघाल्यात जमा आहेत. यामध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि मारोती महाराज कारखाना यांची वर्णी लागते. त्यामुळे साखर कारखाना, सध्याचा पेटलेला पाणीप्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांभवतीच यंदाची निवडणूक होणार हे नक्की.

हेही वाचा - अमरावती विधानसभा आढावा : आमदार डॉ. सुनील देशमुख यांना कोण आव्हान देणार?

मतदार संघाची सध्याची स्थिती

औसा मतदारसंघावर गेल्या दोन टर्मपासून काँग्रेसचे बसवराज पाटील यांचे वर्चस्व आहे. मतदारसंघातील संपर्क आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात असून यंदा हॅट्ट्रिक साधणार असल्याचा त्यांना विश्वास आहे. तर दुसरीकडे युतीमध्ये इच्छुकांची गर्दी वाढत असून यामध्ये अभिमन्यू पवार, अरविंद पाटील तर सेनेकडून संतोष सोमवंशी आणि दिनकर माने यांच्यात शर्यत पाहवयास मिळत आहे.

Last Updated : Sep 18, 2019, 11:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details