लातूर -मागील भांडणाची कुरापत काढून महिलेला तिच्या पती व मुलासह मारहाण करण्यात आली. निलंगा तालुक्यातील बोटकुळ गावात ही घटना घडली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील बोटकुळ येथे पीडित महिलेच्या कुटुंबाला गावातील संदीप मोरे, पवन मोरे, नितीन मोरे, सचिन मोरे यांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. सध्या लातूर येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मागील भांडणाची कुरापत काढून आरोपींनी हे कृत्य केले आहे.