महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : ३२ उमेदवारांचे अर्ज अवैध ; १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - Assembly election

औसा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार म्हणून पांडुरंग चेवले अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जामध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा पक्ष म्हणून असलेला अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. निलंगामध्ये भाजपकडून रूपाताई निलंगेकर पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्या अर्जाला पक्षाचा ए.बी. फॉर्म नसल्याने त्यांची उमेदवारी अवैध ठरविण्यात आली आहे.

लातूर : ३२ उमेदवारांचे अर्ज अवैध ; १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

By

Published : Oct 5, 2019, 11:09 PM IST

लातूर- जिल्ह्यातील सहा विधासभा मतदार संघात एकूण १९३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ३२ पत्र अवैध ठरविण्यात आले असून सद्यस्थितीला १२० उमेदवारांचे १६१ नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आता १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून लातूर ग्रामीणमधून ३१, लातूर शहर ३६, अहमदपूर ३५, उदगीर ३८ निलंगा २८ तर औसा येथून ३५ असे एकूण १९३ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, यापैकी लातूर ग्रामीणमधून १, लातूर शहर ८, अहमदपूर ४, उदगीर ८ निलंगा ८, औसा ३ असे ३२ पत्र अवैध ठरविण्यात आले आहेत.

हेही वाचा - लातूर शहर मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेसपेक्षा वंचितसोबत अधिक - शैलेश लाहोटी

औसा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार म्हणून पांडुरंग चेवले अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जामध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा पक्ष म्हणून असलेला अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. निलंग्यामध्ये भाजपकडून रूपाताई निलंगेकर पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्या अर्जाला पक्षाचा ए.बी. फॉर्म नसल्याने त्यांची उमेदवारी अवैध ठरविण्यात आला आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ : लातूर जिल्ह्यातील ३२ अर्ज अवैध

अपक्ष म्हणून आनंदा कामगुंडा आणि बहुजन समाज पार्टीकडून सतीश मादळे या दोघांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. तर उदगीर येथे जनता दलाचे नामदेव तिकटे यांच्या अर्जावर आवश्यक सूचकांची नावे कमी होती. भारतीय पीपल्स सेनेचे बालाजी सूर्यवंशी हे स्वतः सूचक असल्याने आणि अपक्ष म्हणून यमराज विभुते यांनी जातीचे प्रमाणपत्र जोडले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे.

हेही वाचा - लातूरच्या तरुणाईचा सरकारकडून अपेक्षाभंग; बेरोजगारी, शैक्षणिक समस्या आजही कायम

ABOUT THE AUTHOR

...view details