लातूर- मे महिना चालू झाला आणि उन्हाळा प्रचंड वाढला आहे. निलंगा तालुक्यात सध्या तापमानाचा पारा हा ४५ अंशापर्यंत चढला आहे. रानावनात भटकंती करणारे वन्य प्राण्यांना शेतात कुठेही पाणी मिळत नसल्याने ते चक्क गावकुसात येऊन पाणी पिताना दिसत आहेत.
उन्हाच्या झळा : पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानववस्तीकडे - लातूर दुष्काळ
निलंगा तालुक्यात सध्या तापमानाचा पारा हा ४५ अंशापर्यंत चढला आहे. रानावनात भटकंती करणारे वन्य प्राण्यांना शेतात कुठेही पाणी मिळत नसल्याने ते चक्क गावकुसात येऊन पाणी पिताना दिसत आहेत.
माणसाप्रमाणे उन्हाळ्यात प्राण्यांच्या शरीरातील पाणी कमी भासते. त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करताना गावकुसात दिसत आहेत. विहिरीत पाणी आटले आहेत. तर काही ठिकाणी पाणी पातळी खोल गेली आहे. होते नव्हते ते शेत शिवारातील पाणी संपले असल्यामुळे वन्य प्राण्यांना पाणी मिळत नाही. सध्या गावातही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, हे प्राणी गावात आल्यानंतर त्यांच्या पाण्याची सोय होऊन जाते.
लॉकडाऊनमुळे माणसांसह प्राण्यांचेही खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. बऱ्याच ठिकाणी विविध सामाजिक संघटना प्राण्यांची आणि माणसांची काळजी घेऊन अन्न आणि पाणी पुरवत आहेत. दरम्यान, ज्यांना जसे शक्य होईल, तसे प्राण्यांना आणि माणसांना या कठीण काळात मदत करायला हवी.