लातूर- दुष्काळात शेतकरी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी दोन हात करत असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे दुष्काळात तेरावा महिना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह गोठा जळून खाक झाला आहे. आधीच दुष्काळामुळे कंबरडे मोडले असतानाच महावितरणच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दुष्काळात तेरावा महिना; शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह गोठा जळून खाक - दुष्काळ
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथे शॉर्टसर्किटमुळे जनावरांचा गोठा जळून खाक झाला आहे. तसेच लाखो रुपयांचा कडबाही जळून खाक झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथे शॉर्टसर्किटमुळे जनावरांचा गोठा जळून खाक झाला आहे. तसेच लाखो रुपयांचा कडबाही जळून खाक झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाकली येथील अभंग शिंदे, भानुदास शिंदे आणि गुणवंत शेळके हे शेतवस्तीवर राहतात. घराजवळून विद्युत तारा गेल्या असून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दीड हजार कडबा, शेती अवजारे, धान्य आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
या दुर्घटनेत दीड लाखांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी आणि मंडळ अधिकारी हे पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या नुकसाणीमुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली असून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.