महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधासभेच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीचेच वर्चस्व राहणार; अमित देशमुखांना विश्वास - लातूर मतदारसंघ

महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्भवलेल्या बंडखोरीचे प्रमाण मोठे असून, याचा फटका युतीलाच बसणार असल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. सध्या महाआघाडीने जागा वाटपासह प्रचारात बाजी मारल्याने यंदाची विधानसभा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्भवलेल्या बंडखोरीचे प्रमाण मोठे असून, याचा फटका युतीलाच बसणार असल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले

By

Published : Oct 8, 2019, 9:56 AM IST

Updated : Oct 8, 2019, 1:17 PM IST

लातूर - महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्भवलेल्या बंडखोरीचे प्रमाण मोठे असून, याचा फटका युतीलाच बसणार असल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. सध्या महाआघाडीने जागा वाटपासह प्रचारात बाजी मारल्याने यंदाची विधानसभा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाआघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, जनतेने युती सरकारला 5 वर्ष सेवा करण्याची संधी दिली होती. मात्र, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, आर्थिक मंदी यांसारख्या समस्या कायम असून, जनतेमध्ये सरकारच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा भावांसाठी प्रचारात उतरलेला रितेश देशमुख ठरतोय नागरिकांचे आकर्षण

सध्या सत्ताधाऱ्यांकडून फक्त आश्वासनांची खैरात केली जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका अमित देशमुख यांनी केली आहे. पाण्याअभावी लातूर एमआयडीसी मधील 2000 पैकी 1600 उद्योग बंद आहेत. त्यामुळे सरकारचे खरे रूप जनतेच्या निदर्शनास आले असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांना योग्य जागा दाखवली जाईल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा देशमुख बंधूंचा उमेदवारी अर्ज दाखल; रितेश जेनेलियाची उपस्थिती

राज्याच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांनी पक्षांतर केले असल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री शिवराज चाकूरकर यांनी आयारामांना टोला लगावला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज चाकूरकर, माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार त्रिंबक भिसे व जिल्ह्यातील महाआघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

Last Updated : Oct 8, 2019, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details