लातूर - शहरालगत रेल्वे बोगीचा कारखाना उभारून हजारो युवकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा गाजावाजा पालकमंत्री संभाजी पाटील यांच्याकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या रेल्वे कोचचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय यातून स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळण्याची अपेक्षा आ. अमित देशमुख यांनी थेट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे व्यक्त केली. या व्यतिरिक्त त्यांनी पुणे-लातूर इंटरसिटी सुरू करण्याची मागणी देखील केली आहे.
रेल्वे बोगी कारखान्याचा प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांच्या दारी; अमित देशमुख दिल्ली दरबारी - piyush goyal
लातूर शहरालगत रेल्वे बोगीचा कारखाना उभारून हजारो युवकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा गाजावाजा पालकमंत्री संभाजी पाटील यांच्याकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या रेल्वे कोचचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय यातून स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळण्याची अपेक्षा आ. अमित देशमुख यांनी थेट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे व्यक्त केली.
पुणे शहराकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे, लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ही नवी रेल्वे गाडी सुरु करण्याची मागणी आ. देशमुख यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. लातूर-मुंबई रेल्वे बिदरपर्यंत विस्तारित करण्यात आल्याने लातूर येथील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. शिवाय या मार्गावर अन्य रेल्वे नसल्याने लातूर-मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात यावी. तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या रेल्वेला अतिरिक्त बोगी जोडण्यात याव्यात अशी या भागातील जनतेची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन करण्यात आले आहे. या चैत्यभूमीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी सर्व जलद रेल्वे गाड्यांना पानगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. तर. सत्ताधारी मंत्री जे रेल्वे कोचचा मुद्दा घेऊन रोजगाराचे आश्वासन देत आहेत. तोच मुद्दा आता अमित देशमुख यांनी हायजॅक केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.