लातूर -मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली हा मोठा धक्का आहे. मात्र, स्थगिती उठवण्यासंदर्भात राज्य सरकारचा लढा कायम आहे. स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. यापुढेही आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकार आपल्या स्थरावर प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख यांनी आंदोलकांना दिले. पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
मराठा आरक्षणाचा लढा कायम राहील - पालकमंत्री अमित देशमुख - amit deshmukh on maratha reservation
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने सुरू आहेत. यातच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुखांच्या घराबाहेर देखील आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना आरक्षणाचा लढा कायम राहील असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.
अमित देशमुख
गुरुवारी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या घरासमोर तर दुसरीकडे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले होते. बाभगळगावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा -मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करणार - मुख्यमंत्री