महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरकरांच्या प्रेमापुढे विरोधकही थंडावले - अमित देशमुख - amit deshmukh latur assembly elections 2019

लातूर विधानसभेची निवडणूक ही अमित देशमुख यांच्यासाठी अस्तित्वाची होती. त्यांच्या पराभवासाठी भाजपाबरोबर वंचितचे उमेदवार राजा मणियार हे देखील राष्ट्रवादीतून दाखल झाले होते. मात्र, असे असतानाही अमित देशमुख यांनी हट्रिक साधली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि लातूरकरांनी दिलेले प्रेम हे महत्वाचे आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन मुले हे विधानसभेत पोहोचली, ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

अमित देशमुख

By

Published : Oct 25, 2019, 7:44 PM IST

लातूर - लातूरवासियांना विकास काय असतो हे माहिती आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून अगदी खालच्या स्तराचे राजकारण केले असले. मात्र, तरी लातूरकरांचे प्रेम हेच विजयाची जमेची बाजू असल्याचे, मत आमदारकीची हट्रिक साधलेल्या अमित देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केले.

लातूरकरांच्या प्रेमापुढे विरोधकही थंडावले - अमित देशमुख

हेही वाचा -हरियाणा विधानसभा : अपक्ष अन् बंडखोर आमदारांचा भाजपला पाठिंबा, सत्ता स्थापनेच्या निकट

लातूर विधानसभेची निवडणूक ही अमित देशमुख यांच्यासाठी अस्तित्वाची होती. त्यांच्या पराभवासाठी भाजपबरोबर वंचितचे उमेदवार राजा मणियार हे देखील राष्ट्रवादीतून दाखल झाले होते. मात्र, असे असतानाही अमित देशमुख यांनी आमदारकीची हट्रिक साधली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि लातूरकरांनी दिलेले प्रेम हे महत्वाचे आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन मुलं ही विधानसभेत पोहोचली, ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

हेही वाचा -नगरमध्ये हातकणंगले पॅटर्न : राम शिंदेंनी रोहित पवार यांना बांधला 'विजयी' फेटा

याबरोबर लातूरवासियांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन आहे. यामध्ये लातूरकरांचा पाणीप्रश्न मिटविणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे. याकरिता कामाला लागणार आहे आणि सर्व आश्वासने पूर्ण करणे, हे टार्गेट असल्याचेही त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यात पुन्हा महाआघाडीला गतवैभव मिळाले आहे. जनतेचे हे प्रेम म्हणजे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघे भाऊ कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details