लातूर- अमित देशमुख यांचे मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच लातूरला आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी भल्या पहाटेपासून कार्यकर्ते लातूरच्या रेल्वे स्टेशनवर जमा झाले होते. रेल्वे स्टेशन ते बाभळगावपर्यंत ठिक-ठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मंत्री झाल्यावर प्रथमच अमित देशमुख लातुरात; कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत - लातूर बातमी
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा त्यांच्यावर पदभार सोपवण्यात आला आहे. हा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते लातूरमध्ये आले. काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळणार असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा त्यांच्यावर पदभार सोपवण्यात आला आहे. हा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते लातूरमध्ये आले. काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळणार असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर स्वागतानंतर अमित देशमुख यांनी बाभळगाव येथे जाऊन स्व. विलासराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेतले. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत. अमित देशमुख लातुरात दाखल होताच चौकाचौकात ढोल-ताशांचे गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले.