लातूर - एकट्या उदगीर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लातूर जिल्हा रेडझोनच्या उंबरठ्यावर आहे. जिल्हा प्रशासनाकडून दररोज नियम आणि आदेश काढले जात आहेत. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. उदगीर शहरात कोरोनाबाधितांची संख्या 21 वर गेलेली आहे. भविष्यात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने काय भूमिका घेतली आहे यासंबंधी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आढावा बैठक पार पडली.
मिशन उदगीर : नवनवीन नियम, आदेशाबरोबरच अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रित करा - पालकमंत्री अमित देशमुख - amit deshmukh press conference
एकट्या उदगीर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लातूर जिल्हा रेडझोनच्या उंबरठ्यावर आहे. जिल्हा प्रशासनाकडून दररोज नियम आणि आदेश काढले जात आहेत. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
बैठकीमध्ये राज्यमंत्री संजय बनसोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनीही सहभाग नोंदीवला होता. उदगीर येथील कोरोबाबाधितांचा तपशील जाणून घेऊन भविष्यातील धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर सूचना करण्यात आल्या आहेत. केवळ उदगीर शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, नियम, आदेश तर नव्याने काढले जात आहेतच परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीर शहरातच असून येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन असतील असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. एकंदरीत उदगीर शहरातील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी शहराचे मुख्य मार्ग, प्रभाग, अंतर्गत रहदारीचे रस्ते याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पथकांनी काम करण्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उदगीर मिशन जिल्हा प्रशासनाने हाती घेतले असले तरी स्थानिक पातळीवर या सर्व नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.