महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हार-तुरे अन पुष्पगुच्छांच्या गंधात कृषिमंत्र्यांना दुष्काळाची दाहकता जाणवलीच नाही'

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा जिल्हा दौरा असल्याने शेतकरी मोठा आशादायी होता. मात्र, बोंडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले शिवाय शेती शिवारात न जाता गावच्या मध्यवर्ती ठिकाणाहूनच पिकाचा आढावा घेतला.

कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा सत्कार करताना

By

Published : Aug 6, 2019, 2:44 PM IST

Updated : Aug 6, 2019, 3:27 PM IST

लातूर- शेतकरी संवादाच्या अनुषंगाने कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे मंगळवारी दिवस उजाडताच जिल्ह्यात दाखल झाले खरे. मात्र, लातूरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या गावच्या बसस्थानकावरच त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये हार-तुरे आणि पुष्पगुच्छ याचा गंध यामध्ये जिल्ह्यातील दुष्काळाचा विसर तर पडलाच मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेत दौरा आटोपता घेतला.

सध्या राज्यात पावसाचा हाहाकार असला तरी लातुरात मात्र पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा अडचणीत आहे. सरासरी एवढा पेराही झाला नसून शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यातच कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा जिल्हा दौरा असल्याने शेतकरी मोठा आशादायी होता. मात्र, कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले शिवाय शेती शिवारात न जाता गावच्या मध्यवर्ती ठिकाणाहूनच पिकाचा आढावा घेतला.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा लातूर जिल्हा दौरा

शेतकऱ्यांच्या संवादमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होत असून शेतकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली. पीकविमा, दुबार पेरण्या याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतलाच नाही. आमदार, कार्यकर्ते यांना मुंबईत आपले प्रश्न मांडता येत नाहीत का? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शेतकरी अडचणीत असताना कृषी मंत्र्यांचा दौरा म्हणजे योग्य टायमिंगचा असला तरी उद्देश बाजूला सारून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि हार-तुरे घेण्यातच अधिकचा वेळ खर्ची केला. त्यामुळे कृषिमंत्री यांचा हा दौरा शेतकऱ्यांसाठी होता की कार्यकर्त्यांसाठी, अशी चर्चा गावा गावात रंगत होती.

Last Updated : Aug 6, 2019, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details